अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत 'श्री कुलस्वामी' खंडेराय यांचा अखंड वरदहस्त असलेले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने प्रेरित झालेले मुम्बई-नगरीमध्ये व्यवसाया निमित्त वास्तव्यास असलेले वडज ग्रामस्थ यांना श्री कुलस्वामीच्या सानिध्यात सतत नव विचारांना वाव मिळून श्री कुलस्वामीच्या पूजनाबरोबर आधुनिक समाजाची सेवा करण्याचे वृत्त अंगिकारले. याचे प्रतीक मुंबईमध्ये प्रामुख्याने फळे,फुले,भाजीपाला,कांदा,बटाटा,शेतीमाल किरकोळ ते घाऊक व्यापार करीत असताना तसेच उदरनिर्वाहासाठी नोकरी करीत असताना वडजकरांनी जनतेची आर्थिक सेवा करण्याचे ठरवले. सन १९९५ साली श्री कुलस्वामी सहकार मंडळ मुंबई (वडज) या संस्थेची भायखळा येथे स्थापना केली. फंड भिशी या माध्यमातून जमा झालेल्या निधीतुन पतसंस्था स्थापण्याचा मंडळाने निर्णय घेतला. उभा राहिलेला निधी रु. ७०,००० व ६०० सभासद नोंदणी करून, दिनांक २१ ऑगस्ट १९८३ रोजी भायखळा ई वार्ड विभागीय जनतेस निमंत्रित करून जाहीर सभेत श्री कुलस्वामी को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सहकार तत्वावर स्थापना करण्याच्या द्रुष्टीने पाऊले उचलली. 'सहकारातून समाजपरिवर्तन' करण्यासाठी विभागातील सभासदांच्या सहकार्यानेच दिनांक २१ एप्रिल, १९८४ रोजी गुडीपाढवाच्या शुभ मुहूर्तावर संस्थेचा शुभारंभ झाला.
नूतन सहकारी संस्थेचे उद्घाटन करताना उपस्थित मान्यवरांनी आपले मत प्रदर्शित केले की, सध्या वाढत्या उलाढालीच्या काळात सहकारी संस्था निर्माण करणे हे विधायक काम आहे. सर्व सामान्यांना 'श्री कुलस्वामी' ही पतसंस्था आर्थिक व्यवहारासाठी मार्गदर्शक ठरवून सहकारातून समाज परिवर्तन करील अशी आशा व्यक्त केली.
दिनांक ०३ एप्रिल, १९८४ रोजी ६०० सभासद व रु. ७०,००० भाग भांडवलावर संस्थेचे दैनंदिन कामकाजास सुरवात झाली.
प्रथम दर्शनी पुणे जिल्हयातील मुंबई मधील विभागीय मार्केट
भायखळा, दादर, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर येथील फळे, फुले, भाजीपाला आणि कांदा बटाटा, किरकोळ ते घाऊक व्यापारी तसेच नोकरी व्यवसाय करणारे व्यक्तींनी संस्थेचे सभासद होऊन संस्थेशी व्यवहार सुरु केले.
दिनांक ०३ एप्रिल, १९८४ ते दिनांक ३० जून, १९८४ अखेर संस्थेचा प्रथम वार्षिक अहवाल सादर करून सर्व सामान्य सभासदांचा विश्वास संपादन केला.
बृहन्मुंबई मधील विभागीय मार्केट मधील व्यापार करणारे सभासदांना संस्थेचे संचालक मंडळावर संचालक म्हणून जबाबदारी सोपवून खऱ्या अर्थाने व्यापा-याच्या निमित्ताने मुंबई शहरात स्वतःचा व्यवसाय करीत असताना सामाजिक बांधीलकी म्हणून 'श्री कुलस्वामी' पतसंस्थेचे अनेक व्यक्ती सहकारी कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये जनतेला मार्गदर्शक ठरले.
विभागीय सभासदांचा, व्यापाऱ्यांचा संस्थेवरील दृढविश्वास, अनमोल सहकार्य आणि सदीच्छा मिळवून आवघ्या ५ वर्षात (जुन १९९१ अखेर) संस्था स्वनिधीवर व्यवहार करून रु. १ कोटींचा टप्पा पार केला. रु. २००० पर्यंत कर्ज मर्यादा प्रमाणे गरजुंना अर्थ साहाय्य करून संस्थेच्या सभासदांची वाढती मागणी लक्षात घेऊन जिल्हा बँकेकडून अर्थ सहाय्य न घेता सभासद ठेवीतून आपुलकी आणि जिव्हाळयाने अर्थ सहाय्य करून व्यापाऱ्यांच्या गरजा भागवल्या.
बृहन्मुंबईतील विविध घाऊक फळे, फुले, भाजीपाला मार्केट मधील व्यापाऱ्यांची 'श्री कुलस्वामी' वर विश्वास, अनमोल सहकार्य आणि सदीच्छा मुळेच संस्थेची प्रती वर्षी लक्षणीय वाढ होऊ लागली. सहकार वर्ष १९९०-९१ मध्ये संस्थेचे दैनंदिन कामकाज संगणकाद्वारे करण्यासाठी संस्थेने नव्यानेच प्रथम दर्शनी ब्राईट सिस्टमचा संगणक खरेदी केला. संगणकाद्वारे कार्यालयातील सर्व कामकाज मराठीतून करणारी मुंबईमधील आपली संस्था ही पहिली होती. प्रामुख्याने दैनंदिन वसुली मासिक पावत्या सभासदांना संगणकाद्वारे महिन्याअखेर त्वरित देणारी संस्था मानली गेली.
संस्थेचे कार्यक्षेत्र ई वार्ड मुंबई पर्यंत मर्यादित होते. बृह्न्मुंबई मधील सर्व शेतीमाल घाऊक मंडया नवी मुंबईत स्थलांतर होत असल्याने, कार्यक्षेत्राची वाढ करणे गरजेचे असल्याने संस्थेचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबई बरोबर नवी मुंबई पर्यंत सहकार खात्यातून वाढुन मिळाली. संस्थेचा सहकारातील नावलौकीक म्हणून व्यवस्थापन मंडळाने शाखाविस्तार तसेच शेती उत्पादीत माल व्यापारांप्रमाणे उत्पादकांना देखील आर्थिक सहाय्य करता यावे म्हणुन ठाणे आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील शाखाविस्तार करण्यास संस्थेस यश आले. नवी मुंबई मंडईत विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम शेतकऱ्यांना त्याच दिवशी आपल्या खात्यात जमा करणारी आपली प्रथम मानाची संस्था होय.
सभासदांच्या मुलांना शैक्षणिक विशेष प्राविण्याबद्दल समारंभ पुर्वक गुणगौरव करून श्री कुलस्वामी शिष्यवृत्ती व पारितोषिके वितरण करण्याचा प्रत्येक वर्षी आगळा वेगळा विभागवार समारंभ साजरे करून विधार्थांमध्ये स्पर्धा निर्माण केली. बहुसंख्य सभासदांची मुले शैक्षणिक गुणवत्ता मिळवल्याने उच्चपदावर काम करीत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
बँकिंग क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस होणारी प्रगती, व्यवसाय वाढीसाठी केली जाणारी स्पर्धा त्यामुळे होणारे फायदे तोटे लक्षात घेता व्यवस्थापनाने वेळोवेळी उत्कर्षाची वाटचाल केली. सहकारात हेवेदावे न करता सर्व घटकांना संस्थेची प्रगतीमध्ये समाविष्ट करून काम करण्यास संधी दिली. बृहन्मुंबई मधील सेंट्रल रेल्वे मार्गातील मुख्य स्थानका समोर शाखा,नवी मुंबई मध्ये प्रत्येक नोडमध्ये तसेच पुणे नाशिक हायवेवरील व्यापारी शहराचे बस डेपो समोर अशा ३७ शाखा निर्मिती करून १,०००,००,च्या वर सभासदांची आर्थिक सेवा सद्द स्थितीमध्ये सी. बी. एस. कार्य प्रणालीद्वारे करीत आहे.
सन २००७-२००८ या रोप्य महोत्सवी वर्षांमध्ये शहर व ग्रामीण भागातून एक महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असता, महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामध्ये स्वावलंबी असलेली आदर्श व आग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक मिळवला. शानदार रोप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. 'श्री कुलस्वामी' परिवाराचे सहकारातून समाजपरिवर्तनीय कार्य संस्थेच्या ऍक्सेस संकल्पना, 'एक कुटुंब एक बँक' योजना पुरुष व महिला बचतगट योजना 'श्री कुलस्वामी प्रतिष्ठाण' ह्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य व क्रीडा विषयक विविध उपक्रमाद्वारे जनमाणसापर्यंत माहिती गेल्याने संस्थेच्या प्रगतीमध्ये नावलोकीक वाढत गेला.
आपली माणसे ! आपली संस्था !! या नाम गजराने, मुंबई, नवीमुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांमध्ये ३७ शाखाद्वारे सभासदांना विनम्र सेवा देत आहेत. तंत्रज्ञानामुळे जे जे शक्य आहे ते सर्व संस्थेने तुमच्यासाठी हजर केले आहे.